Megha's Kitchen

Megha's Kitchen Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Megha's Kitchen, Kitchen/Cooking, Mumbai.

Megha's Kitchen
नमस्कार मंडळी 🙏 , मेघाच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे . मी येथे सर्व प्रकारच्या पाककृती शेअर करणार आहे . सर्व पाककृती सोप्या पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने सूचनांसह समजावून सांगितल्या आहेत . जेणेकरून कोणीही हे पदार्थ बनवू शकेल .

04/05/2026

तांदळाच्या पिठाची साठवणीची वाळवणाची २ वर्ष टिकणारी खुसखुशीत चकली 😋

साहित्य : -
- दिड टोप पाणी ( दिड पट )
- १ मोठा टोप रेशनच्या तांदळाचे पीठ ( अर्धा किलो )
- १ फूल चमचा पापडखार
- १ फूल चमचा मीठ
- अर्धा चमचा हिंग
- १ फूल चमचा लाल तिखट
- १ चमचा ओवा
- २ मोठे चमचे तीळ
- १ मोठा चमचा तेल

टिप्स : -
- चकलीचे पीठ पूर्णपणे शिजलेले असेल तरच चकलीची तार एकसारखी येते आणि चकल्यांना छान आकार येतो .
- पीठ कच्चे राहिल्यास चकलीचे तुकडे पडतात .
- शिजवलेले पीठ मळून मऊसर केले तरच एकसारखी चकली तयार होते . डायरेक्ट शिजवलेले पीठ सोऱ्यात भरल्यास चकल्या तर बनतील पण चकलीचा परफेक्ट आकार येणार नाही .
- या साठवणीच्या चकल्या २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवाव्यात म्हणजे त्या फुलून छान दुप्पट तिप्पट मोठ्या होतात .
चवीला खूपच स्वादिष्ट होणाऱ्या या चकल्या अजीबात तेलकट होत नाही . खुपच खुसखुशीत व कुरकुरीत होतात .
- चकल्या फक्त सावलीत सुकवल्या तर त्या जास्त फुलत नाही व आतपर्यंत तळल्या जात नाही व कच्च्या राहतात .
म्हणून चकल्या उन्हात वाळवूनच नंतर डब्यात भरून ठेवाव्यात .

धन्यवाद 🙏😊

03/05/2026

तांदळाच्या पिठाची वाळवणाची दुप्पट तिप्पट फुलणारी साठवणीची खुसखुशीत चकली अर्धा किलोच्या योग्य प्रमाणासहित । तांदळाच्या पिठाची साठवणीची चकली । Tandalachya Pithachi Sathavanichi Chakli l Valvan Chakli Recipe l Valvan Chakli l Valvan Recipe l Valvan l Summer Food l Summer Recipe l Rice Flour Chakli l Chakli Recipe l Chakli

साहित्य : -
दिड टोप पाणी ( दिड पट )
१ मोठा टोप रेशनच्या तांदळाचे पीठ ( अर्धा किलो )
१ फूल चमचा पापडखार
१ फूल चमचा मीठ
अर्धा चमचा हिंग
१ फूल चमचा लाल तिखट
१ चमचा ओवा
२ मोठे चमचे तीळ
१ मोठा चमचा तेल

टिप्स : -
- चकलीचे पीठ पूर्णपणे शिजलेले असेल तरच चकलीची तार एकसारखी येते आणि चकल्यांना छान आकार येतो .
पीठ कच्चे राहिल्यास चकलीचे तुकडे पडतात .
- शिजवलेले पीठ मळून मऊसर केले तरच एकसारखी चकली तयार होते . डायरेक्ट शिजवलेले पीठ सोऱ्यात भरल्यास चकल्या तर बनतील पण चकलीचा परफेक्ट आकार येणार नाही .
- या साठवणीच्या चकल्या २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवाव्यात म्हणजे त्या फुलून छान दुप्पट तिप्पट मोठ्या होतात .
- चवीला खूपच स्वादिष्ट होणाऱ्या या चकल्या अजीबात तेलकट होत नाही . खुपच खुसखुशीत व कुरकुरीत होतात . - चकल्या फक्त सावलीत सुकवल्या तर त्या जास्त फुलत नाही व आतपर्यंत तळल्या जात नाही व कच्च्या राहतात .
म्हणून चकल्या उन्हात वाळवूनच नंतर डब्यात भरून ठेवाव्यात .

धन्यवाद 🙏😊

01/05/2026

तांदळाचे लाटीव पापड । पांढरेशुभ्र होणारे तिप्पट चौपट फुलणारे तांदळाचे पापड । Tandalache Papad l Tandalache Lativ Papad l Rice Papad l Papad Recipe l Rice Flour Papad l Tandalachya Pithache Papad l Papad l Valvan l Valvan Recipe l Summer Recipe l Summer Food l Papad Recipe in Marathi

साहित्य : -
- अडीच मोठ्या वाट्या पाणी
- २ मोठ्या वाट्या तांदळाचे पीठ ( अर्धा किलो )
- १ चमचा मीठ
- १ चमचा पापडखार - पाव चमचा हिंग
- १ मोठा चमचा तेल

* टिप्स : -
पापड ३ - ४ दिवस सुकवल्यानंतरच डब्यात भरून ठेवावे . वर्ष - २ वर्ष टिकतात .
तेल तळण्यासाठी भरपूर तेल घ्यावे व कडकडीत गरम करावे म्हणजे पापड तळून आकाराने तिप्पट चौपट होतात .
पापड पातळसरच लाटावे म्हणजे ते जास्त फुलतात व खुसखुशीत होतात .
तळल्यानंतर हे पापड पांढरेशुभ्र होतात व अजीबात लालसर पडत नाही .

नक्की बनवून बघा 😊
धन्यवाद 🙏

30/04/2026

रेडीमेड नाचणीच्या पीठाचे खूपच खुसखुशीत असे मसाला खिचे पापड 😋

साहित्य :-

- १ मोठी वाटी नाचणीचे रेडिमेड पीठ (२५० ग्रॅम)

- दीड वाटी पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार

- पाव चमचा हिंग

१ मोठा चमचा तेल

- १ फूल चमचा लाल तिखट

- २ मोठे चमचे तीळ

- १ चमचा जीरे (कुटून घेतलेले)

* टिप्स :-

- नाचणीचे हे मसाला पापड रेडीमेड पिठापासून बनवलेले असल्यामुळे पाण्याचं आणि पिठांचं प्रमाण अगदि परफेक्ट आहे. त्यामुळे पापड छान पातळसर होतात व तळल्यानंतर खुपच खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनतात .

- अजीबात तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्ष - २ वर्ष सहज टिकतात .

- हे पापड रेडिमेड पिठाचे असल्यामुळे पापडखार टाकणे खुपच महत्वाचे आहे. पापडखारमुळे पापड छान फुलतो, हलका होतो व खुसखुशीत सुद्धा होतो .

- पापड हे पातळसरच लाटावे तरच पापड दुप्पट तिप्पट फुलतो.

- खिशी घेताना सुरुवातीला पीठ मंद आचेवर ५ मिनिटे शिजते आणि पीठ एकजीव झाल्यावर मंद आचेवरच झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे म्हणजे एकूण १५ मिनिटांत पापडाचे पीठ परफेक्ट शिजते. कच्चे राहत नाही. त्यामुळे पापड एकसारखे होतात व अजीबात चिरत नाही.

- हे पापड तळल्यानंतर हलके तर होतातच पण अजीबात तेलकट होत नाही .
धन्यवाद 🙏😊

28/04/2026

तांदळाच्या पिठाचे खुपच खुसखुशीत पट्टी पापड प्रकार - २ 😊

साहित्य :-

- २ मोठ्या वाट्या (५०० ग्रॅम) तांदळाचे पीठ

- अडीच वाट्या पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार
पाव चमचा हिंग

- १ मोठा चमचा तेल

* टिप्स : -

रेशनचे तांदूळ ४ ते ५ पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून झाल्यावर सुती कपड्यावर पसरून पंख्याच्या हवेखाली सावलीतच ४ ते ५ तास सुकवून घ्यायचे आणि नंतर गिरणीमधून मैद्याप्रमाणे अगदि बारीक असे दळून आणायचे .

- गॅस मंद करूनच घाटा घ्यायचा व मंद आचेवरच पीठ शिजवायचं .

- पीठ कच्चे राहिल्यास पापड चिरतात व सुकताना त्याचे तुकडे पडतात .

- पापड कोणताही असो नेहमी पातळच लाटायचा म्हणजे छान फुलतो व खूपच ठिसूळ आणि खुसखुशीत होतो .

- पट्टी पापड बनवण्यासाठी आपण पिझ्झा कटर सुद्धा वापरू शकता .

- पापड तळताना तेल कडकडीतच गरम करायचं म्हणजे पापड छान फुलतो आणि हलका होतो व अजीबात तेलकट होत नाही.

- खूपच खुसखुशीत होणारे हे पापड चवीला अप्रतिम लागतात म्हणून लहान मुले तसेच सर्वचजन हे पापड आवडीने खातात. कितीही पापड खाल्ले तरी मन भरत नाही. पापडाची चव जिभेवर रेंगाळत राहते .|
धन्यवाद 🙏😊

27/04/2026

नाचणीच्या पापडाचे पीठ बनवण्यासाठी कोणतीही झंझट न करता मार्केटमधील रेडिमेड नाचणीच्या पिठापासून बनवा खुसखुशीत मसाला खिचे पापड । नाचणीचे मसाला पापड । नाचणीचे खिचे पापड । नाचनीचे खिशीचे पापड । नागलीचे पापड । नागली पापड । रागी पापड । Nachni Masala Papad l Nachni Khiche Papad l Nagli Papad l Nagliche Papad l Healthy Papad Recipe l Ragi papad l Papad Recipe in Marathi l Summer Recipe l Valvan Recipe l Summer Food l Papad Recipe

साहित्य :-

- १ मोठी वाटी नाचणीचे रेडिमेड पीठ (२५० ग्रॅम)

- दीड वाटी पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार

- पाव चमचा हिंग

१ मोठा चमचा तेल

- १ फूल चमचा लाल तिखट

- २ मोठे चमचे तीळ

- १ चमचा जीरे (कुटून घेतलेले)

* टिप्स :-

- नाचणीचे हे मसाला पापड रेडीमेड पिठापासून बनवलेले असल्यामुळे पाण्याचं आणि पिठांचं प्रमाण अगदि परफेक्ट आहे. त्यामुळे पापड छान पातळसर होतात व तळल्यानंतर खुपच खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनतात .

- अजीबात तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्ष - २ वर्ष सहज टिकतात .

- हे पापड रेडिमेड पिठाचे असल्यामुळे पापडखार टाकणे खुपच महत्वाचे आहे. पापडखारमुळे पापड छान फुलतो, हलका होतो व खुसखुशीत सुद्धा होतो .

- पापड हे पातळसरच लाटावे तरच पापड दुप्पट तिप्पट फुलतो.

- खिशी घेताना सुरुवातीला पीठ मंद आचेवर ५ मिनिटे शिजते आणि पीठ एकजीव झाल्यावर मंद आचेवरच झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे म्हणजे एकूण १५ मिनिटांत पापडाचे पीठ परफेक्ट शिजते. कच्चे राहत नाही. त्यामुळे पापड एकसारखे होतात व अजीबात चिरत नाही.

- हे पापड तळल्यानंतर हलके तर होतातच पण अजीबात तेलकट होत नाही .

- पापड तळण्यासाठी पापड बुडेल इतके तेल घ्यावे म्हणजे पापड छान फुलतो .

- पापड तळताना तेल कडकडीत गरम हवे त्यामुळे पापड लगेचच फुलून वर येतो व खुसखुशीत बनतो .

- हे पापड सुकवण्यासाठी उन्हाची गरज लागत नाही . घरातच पंख्याच्या हवेखाली ३ दिवसात छान कडक होतात व साठवून ठेवता येतात .

- तसे हे पापड खूपच पातळसर व हलके बनल्यामुळे एका दिवसातच सुकतात व रात्री लगेचच तळून देखील खाता येतात .

- जीरे कुटून टाकल्यामुळे हे मसाला पापड फारच रूचकर लागतात .

- आपण यात धना पावडर देखील टाकू शकता .

- १ मोठी वाटी (२५० ग्रॅम) नाचवीच्या पिठात मध्यम आकाराचे ४० - ४५ पापड तयार होतात .

धन्यवाद🙏😊

25/04/2026

तांदळाच्या पिठाचे पट्टी पापड 😋

साहित्य :-

- २ मोठ्या वाट्या (५०० ग्रॅम) तांदळाचे पीठ

- अडीच वाट्या पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार

- पाव चमचा हिंग

- १ मोठा चमचा तेल

* टिप्स : -

रेशनचे तांदूळ ४ ते ५ पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून झाल्यावर सुती कपड्यावर पसरून पंख्याच्या हवेखाली सावलीतच ४ ते ५ तास सुकवून घ्यायचे आणि नंतर गिरणीमधून मैद्याप्रमाणे अगदि बारीक असे दळून आणायचे .

- गॅस मंद करूनच घाटा घ्यायचा व मंद आचेवरच पीठ शिजवायचं .

- पीठ कच्चे राहिल्यास पापड चिरतात व सुकताना त्याचे तुकडे पडतात .

- पापड कोणताही असो नेहमी पातळच लाटायचा म्हणजे छान फुलतो व खूपच ठिसूळ आणि खुसखुशीत होतो .

- पट्टी पापड बनवण्यासाठी आपण पिझ्झा कटर सुद्धा वापरू शकता .

- पापड तळताना तेल कडकडीतच गरम करायचं म्हणजे पापड छान फुलतो आणि हलका होतो व अजीबात तेलकट होत नाही.

- खूपच खुसखुशीत होणारे हे पापड चवीला अप्रतिम लागतात म्हणून लहान मुले तसेच सर्वचजन हे पापड आवडीने खातात. कितीही पापड खाल्ले तरी मन भरत नाही. पापडाची चव जिभेवर रेंगाळत राहते
धन्यवाद 🙏😊.|

23/04/2026

साध्या मक्याच्या पिठाचे खुसखुशीत खिचे पापड / खिशीचे पापड 😋

साहित्य :-

- १ टोप चाळलेले बारीक मक्याचे पीठ (अर्धा किलो)

- २ टोप पाणी

- २ सपाट चमचे मोठ

- २ सपाट चमचे पापडखार

- अर्धा चमचा हिंग

- १ मोठा चमचा तेल

* टिप्स :-

- मक्याचे पीठ बारीकच दळून आणायचे. पीठ जाड असल्यास शिजल्यावर पिठाला चिगटपणा येणार नाही व पापडाचे तुकडे पडतील .

- पिठ पूर्णपणे शिजल्यावर चिगट होते. १० मिनीटांत परफेक्ट शिजते.

- हे पापड बनवण्यासाठी अजीबात तेलाचा वापर केलेला नाही. त्यामुळे पापड वर्ष - २ वर्ष खराब होत नाही.

- लाट्या बनवून पापड केल्यास तेलाचा वापर करावा लागतो म्हणून लाट्या बनवून पापड बनवणे टाळा. तेलामुळे काही महिन्यातचं पापडांना तेलाचा खुबट वास येतो .

- खिशी घेताना फक्त १ मोठा चमचा तेल घ्यायचे. त्यामुळे पापड खूपच ठिसूळ आणि खुसखुशीत बनतो .

- चवीला तर हे पापड अप्रतिम लागतात. जिभेवर नुसती चव रेंगाळत राहते. कितीही पापड खाल्ले तरी मन भरत नाही.

- आईच्या हातच्या चवीचे साध्या पिठाचे व सोप्या पद्धतीचे पापड एकदा बनवले तर प्रत्येक वर्षी हिच रेसिपी फॉलो कराल हि १०० टक्के गॅरन्टी आहे

नक्की बनवून बघा😊

धन्यवाद 🙏

22/04/2026

आजपर्यंत कधीही न पाहिलेली रेशनच्या तांदळाच्या पिठाची १०० % परफेक्ट पट्टी पापड रेसिपी । पट्टी पापड । पट्टी पापड रेसिपी । Patti Papad l Patti Papad Recipe l Boby Papad l Ribbon Papad l Rice Flour Papad l Rice Papad l Tandalachya Pithache Papad l Valvan Recipe l Summer Recipe l Papad l Papad Recipe

साहित्य :-

- २ मोठ्या वाट्या (५०० ग्रॅम) तांदळाचे पीठ

- अडीच वाट्या पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार
.पाव चमचा हिंग

- १ मोठा चमचा तेल

* टिप्स : -

रेशनचे तांदूळ ४ ते ५ पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून झाल्यावर सुती कपड्यावर पसरून पंख्याच्या हवेखाली सावलीतच ४ ते ५ तास सुकवून घ्यायचे आणि नंतर गिरणीमधून मैद्याप्रमाणे अगदि बारीक असे दळून आणायचे .

- गॅस मंद करूनच घाटा घ्यायचा व मंद आचेवरच पीठ शिजवायचं .

- पीठ कच्चे राहिल्यास पापड चिरतात व सुकताना त्याचे तुकडे पडतात .

- पापड कोणताही असो नेहमी पातळच लाटायचा म्हणजे छान फुलतो व खूपच ठिसूळ आणि खुसखुशीत होतो .

- पट्टी पापड बनवण्यासाठी आपण पिझ्झा कटर सुद्धा वापरू शकता .

- पापड तळताना तेल कडकडीतच गरम करायचं म्हणजे पापड छान फुलतो आणि हलका होतो व अजीबात तेलकट होत नाही.

- खूपच खुसखुशीत होणारे हे पापड चवीला अप्रतिम लागतात म्हणून लहान मुले तसेच सर्वचजन हे पापड आवडीने खातात. कितीही पापड खाल्ले तरी मन भरत नाही. पापडाची चव जिभेवर रेंगाळत राहते .|

धन्यवाद 🙏😊

20/04/2026

अर्धा किलोच्या योग्य प्रमाणात बनवा पारंपारिक पद्धतीचे अगदि साध्या मक्याच्या पिठाचे तोंडात टाकताच विरघळणारे खिचे पापड / खिशीचे पापड । मक्याच्या पिठाचे खिचे पापड | मका खिचे पापड । खिचे पापड | खिचे पापड रेसिपी । Makyachya Pithache Khiche Papad l Makka Khiche Papad l Makka Papad l Khiche Papad Recipe l Khiche Papad l Valvan Recipe l Summer Food Recipe l Summer Recipe । Khishiche Papad l Makka Khishi Papad l Papad l Papad Recipe in Marathi l Papad Recipe

साहित्य :-

- १ टोप चाळलेले बारीक मक्याचे पीठ (अर्धा किलो)

- २ टोप पाणी

- २ सपाट चमचे मोठ

- २ सपाट चमचे पापडखार

- अर्धा चमचा हिंग

- १ मोठा चमचा तेल

* टिप्स :-

- मक्याचे पीठ बारीकच दळून आणायचे. पीठ जाड असल्यास शिजल्यावर पिठाला चिगटपणा येणार नाही व पापडाचे तुकडे पडतील .

- पिठ पूर्णपणे शिजल्यावर चिगट होते. १० मिनीटांत परफेक्ट शिजते.

- हे पापड बनवण्यासाठी अजीबात तेलाचा वापर केलेला नाही. त्यामुळे पापड वर्ष - २ वर्ष खराब होत नाही.

- लाट्या बनवून पापड केल्यास तेलाचा वापर करावा लागतो म्हणून लाट्या बनवून पापड बनवणे टाळा. तेलामुळे काही महिन्यातचं पापडांना तेलाचा खुबट वास येतो .

- खिशी घेताना फक्त १ मोठा चमचा तेल घ्यायचे. त्यामुळे पापड खूपच ठिसूळ आणि खुसखुशीत बनतो .

- चवीला तर हे पापड अप्रतिम लागतात. जिभेवर नुसती चव रेंगाळत राहते. कितीही पापड खाल्ले तरी मन भरत नाही.

आईच्या हातच्या चवीचे साध्या पिठाचे व सोप्या पद्धतीचे पापड एकदा बनवले तर प्रत्येक वर्षी हिच रेसिपी फॉलो कराल हि १०० टक्के गॅरन्टी आहे

नक्की बनवून बघा 😊

धन्यवाद🙏

16/04/2026

रेशनच्या तांदळाच्या पिठाचे खिचे / खिशीचे पापड 😋

साहित्य :-

- २ वाट्या तांदळाचे पीठ

- ३ वाट्या पाणी

- १ छोटा चमचा पापडखार

- १ छोटा चमचा मिठ

- १ चमचा तेल

- पाव चमचा हिंग

टिप्स : -

- खिशी घेताना पाणी उकळल्यावर लगेचच गॅस कमी करून मगच त्यात चाळलेले तांदळाचे पीठ टाकावे म्हणजे गाठी होत नाहीत

- पीठ पूर्णपणे शिजल्यावर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तपासून पहावे. पीठ हाताला चिटकले तर पीठ कच्चे आहे असे समजावे व झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे म्हणजे कच्चे राहणार नाही .

- पीठ पूर्णपणे शिजल्यावर पीठाला चिकटपणा येतो आणि पीठ हाताला चिटकत नाही .

पापड सुकल्यावर पारदर्शक होतात आणि पापडांना एक प्रकारची चमक येते.

- गरज वाटली तर लाट्या बनवताना सुरुवातीलाच हाताला थोडंसं तेल लावायचं आणि लाट्या बनवायच्या

- हे पापड खुपच खुसखुशीत होतात अगदि जिभेवर ठेवताच विरघळतात. चवीला तर इतके स्वादिष्ट लागतात की तळलेले पापड लगेचच संपतात व पुन्हा पापड तळावे लागतात .

धन्यवाद 🙏😊

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Megha's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share