She Plans Dinner

She Plans Dinner Veg marathi Recipes
www.youtube.com/sheplansdinner

Permanently closed.
05/12/2025

पावट्याच्या दाण्यांची झणझणीत आमटी...रेसिपी
करायला अगदी सोपी आहे...नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी

पावट्याचे दाणे हे भरपूर पोषण देणारे असतात:
प्रोटीन,फायबर,फॉलिक अॅसिड,व्हिटॅमिन B
,कॉपर, आयर्न, मॅग्नेशियम,अँटिऑक्सिडंट्स
हे दाणे शरीराला ऊर्जा देतात आणि पचन सुधारतात.
हिवाळ्यात जेव्हा पावटा मार्केट मध्ये येऊ लागतो तेव्हा तुमच्या आहारामध्ये याचा नक्की समावेश करा.

She Plans Dinner

घरी सगळ्यांना सुरळीच्या वड्या म्हणजेच खांडवी सगळ्यांना आवडते तर फार्माईश सुरू होती कर ना खूप दिवस  “सुरळीच्या वड्या खाल्...
26/11/2025

घरी सगळ्यांना सुरळीच्या वड्या म्हणजेच खांडवी सगळ्यांना आवडते तर फार्माईश सुरू होती कर ना खूप दिवस “सुरळीच्या वड्या खाल्ल्या नाहीत..
तर मग काय… लगेच बनवल्या एकदम मऊ, झटपट आणि परफेक्ट रोल होणाऱ्या सुरळीच्या वड्या 🥰
आणि हो… तुम्हालाही रेसिपी देऊन टाकते 😉👇
🍛 सुरळीच्या वड्या – रेसिपी

🧂 साहित्य :
पीठासाठी –
बेसन – 1 कप
दही – ½ कप (थोडं आंबट असेल तर उत्तम)
पाणी – 1 ते 1¼ कप
हळद – ¼ टीस्पून
आलं-हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – 1 टीस्पून
लिंबाचा रस – 1 टीस्पून (ऐच्छिक)
हिंग – चिमूटभर

फोडणीसाठी –
तेल – 2 टीस्पून
मोहरी – ½ टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
कढीपत्ता – 7–8 पाने

गार्निश –
ओले खोबरे
बारीक चिरलेली कोथिंबीर

👩🏻‍🍳 कृती :

1. पीठ तयार करणे :
एका भांड्यात बेसन + दही + हळद + मीठ + लिंबाचा रस + पेस्ट + हिंग घालून पाण्यासोबत मिक्सरमध्ये गाठी नसलेलं गुळगुळीत पीठ तयार करा.

2. शिजवणे :
जाड बुडाच्या पॅनमध्ये हे मिश्रण मंद–मध्यम आचेवर सतत ढवळत शिजवा.
4–5 मिनिटांत ते घट्ट आणि पसरवता येण्यासारखं होईल. गॅस बंद करा.

3. वड्या पसरवणे :

उलट्या ताटांवर/प्लेट्सवर हलकं तेल लावा
गरमागरम मिश्रण पातळ पसरवा
10 मिनिटांनी थंड होऊ द्या
सुरीने लांब पट्ट्या कापा
वरून खोबरे + कोथिंबीर पसरून रोल करा

4. फोडणी :
तेल गरम करून मोहरी-जिरे-कढीपत्ता तडतडवा आणि ही फोडणी तयार रोल्सवर घाला.
वरून पुन्हा थोडं खोबरे, कोथिंबीर

✨ परफेक्ट सुरळीच्या वड्यांच्या टिप्स :

मिश्रण शिजवतांना सतत ढवळणं खूप महत्त्वाचं
दही थोडंसं आंबट असेल तर चव मस्त!
खूप घट्ट झालं तर थोडं गरम पाणी घालून ढवळा
गरम असतानाच पसरवलं तर वड्या छान रोल होतात

झाल्या आपल्या मस्त टेस्टी सुरळीच्या वड्या 😍
@सोनाली कुलकर्णी Plans Dinner
#सुरळीच्यावड्या

नारळी भात बनवण्यासाठी लागणार साहित्य..:बासमती तांदूळ – १ वाटीपाणी – २ वाटीसाजूक तूप – ४ चमचेखवणलेला ताजा नारळ – १ वाटीगु...
08/08/2025

नारळी भात बनवण्यासाठी लागणार साहित्य..:
बासमती तांदूळ – १ वाटी
पाणी – २ वाटी
साजूक तूप – ४ चमचे
खवणलेला ताजा नारळ – १ वाटी
गुळ – १ वाटी (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
८–९ लवंग
वेलदोड्याची पावडर – १/२ चमचा
केशर – थोडं ( 2 चमचे गरम दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा)
काजू व बदाम ,पिस्ता – थोडेसे, तुपात भाजून
थोडे मनुके
मीठ – एक चिमूट

▪️ तांदूळ धुवून २०-३० मिनिटे तसेच भिजत ठेवायचे
▪️कुकर मध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यात लवंग परतून घ्यायची लवंग चांगली फुलली की त्यात भिजवलेले तांदूळ थोडेसे परतून घ्या.
▪️त्यात २ कप पाणी आणि चिमूटभर मीठ घालून झाकण लावून कूकरच्या 3 किंवा ४ शिट्या करून भात शिजवून घ्यावा .
तांदूळ तुपात परतल्याने आणि आधी भिजवून ठेवल्याने खमंग आणि मोकळा शिजला जातो (कोणताही गोड पदार्थ करताना किंचित मीठ घालावं पदार्थाची गोडी वाढते)
▪️आता कढईमध्ये उरलेलं 2 चमचे तूप गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता मनुका खरपूस परतून बाजूला काढून ठेवायचे.
▪️त्याच तुपात गुळ आणि खवणलेला नारळ परतून घ्यायचा, मध्यम आचेवर गुळ विरघळेपर्यंत गुळ खोबऱ्याचे मिश्रण परतून घ्यायचे..
मिश्रण तयार होते तोपर्यंत कूकरच्या 3 शिट्या झाल्यावर भात एका ताटात काढून थंड करून घ्यायचा.
▪️नंतर त्यात वेलदोड्याची पूड, केशराचं दूध/पाणी, शिजलेला तांदूळ,घालायचा छान मिक्स करून घ्यायचा त्यानंतर तुपात परतलेले dryfruits घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे.
▪️झाकण ठेवून २ मिनिटामध्ये मंद आचेवर वाफ येऊ द्यायची.
२ मिन नंतर पुन्हा पुन्हा एकदा भात हलवून घ्यायचा
आणि पुन्हा २–३ मिन मंद आचेवर वाफ येऊ द्यायची.
▪️आपला नारळी भात झाला की🤩 आता गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवून ठेवावा म्हणजे तो चांगला मुरतो.
तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने करता ते comment मध्ये नक्की सांगा.. हां....
🥥 नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा💐!!
सोनाली कुलकर्णी
She Plans Dinner

#नारळीपौर्णिमा #रक्षाबंधन2025 #रेसिपी

08/08/2025

नारळी भात बनवण्यासाठी लागणार साहित्य..:
बासमती तांदूळ – १ वाटी
पाणी – २ वाटी
साजूक तूप – ४ चमचे
खवणलेला ताजा नारळ – १ वाटी
गुळ – १ वाटी (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
८–९ लवंग
वेलदोड्याची पावडर – १/२ चमचा
केशर – थोडं ( 2 चमचे गरम दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा)
काजू व बदाम ,पिस्ता – थोडेसे, तुपात भाजून
थोडे मनुके
मीठ – एक चिमूट

#नारळीभात
#नारळीपौर्णिमा

#
#नारळीपौर्णिमा #रक्षाबंधन2025 #रेसिपी

आले-लसूण पेस्ट घरी बनवणं खूप सोपं आहे आणि ती योग्य पद्धतीने बनवली तर जास्त दिवस टिकते. चला पाहूया सोपी पद्धत आणि काही खा...
01/08/2025

आले-लसूण पेस्ट घरी बनवणं खूप सोपं आहे आणि ती योग्य पद्धतीने बनवली तर जास्त दिवस टिकते. चला पाहूया सोपी पद्धत आणि काही खास टिप्स.

आले-लसूण पेस्ट बनवण्याची पद्धत
साहित्य:
* लसूण: १ वाटी (सोललेला)
* आले: पाऊण वाटी (साले काढून बारीक तुकडे केलेले)
* तेल: २-३ चमचे
* मीठ: १ चमचा

कृती:
* सर्वात आधी आले आणि लसूण स्वच्छ धुवून घ्या. आले किसून घ्या किंवा छोटे तुकडे करा.
1) मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि आल्याचे तुकडे घाला.
2) त्यामध्ये मीठ आणि तेल घाला.
3) आता हे मिश्रण थोडे थोडे करून बारीक वाटा. शक्यतो पाणी घालू नका. तेलामुळे पेस्ट चांगली होते आणि लवकर खराब होत नाही.
४) मिश्रण एकसारखे आणि पेस्टसारखे होईपर्यंत वाटा. गरज वाटल्यास थोडेसे तेल घालू शकता, पण पाणी घालू नका.
पेस्ट टिकवण्यासाठी खास टिप्स
५) पाण्याचा वापर टाळा: पेस्ट बनवताना पाण्याचा वापर अजिबात करू नका. पाणी घातल्यास पेस्ट लवकर खराब होते.
६) स्वच्छ आणि कोरडी बरणी: पेस्ट ठेवण्यासाठी काचेची किंवा प्लास्टिकची हवाबंद (airtight) बरणी वापरा. बरणी पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असल्याची खात्री करा.
७) तेल आणि मीठ: पेस्टमध्ये मीठ आणि तेल घालणे आवश्यक आहे. हे दोन्ही नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करतात आणि पेस्ट जास्त काळ ताजी ठेवतात. तुम्ही पेस्ट वरून थोडे तेल सोडून ठेवू शकता.
८) व्हिनेगरचा वापर: जर तुम्हाला पेस्ट जास्त काळ, म्हणजे महिनोन्महिने टिकवायची असेल, तर पेस्टमध्ये १ चमचा व्हिनेगर घालू शकता. व्हिनेगरमुळे पेस्टचा रंग किंवा चव फारशी बदलत नाही आणि ती खूप दिवस टिकते.
9) फ्रिजमध्ये साठवा: पेस्ट नेहमी फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे ती ताजी राहते आणि लवकर खराब होत नाही.
१०) कोरड्या चमच्याचा वापर: पेस्ट काढण्यासाठी नेहमी कोरड्या आणि स्वच्छ चमच्याचा वापर करा. ओल्या चमच्यामुळे पेस्टला बुरशी येऊ शकते.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when She Plans Dinner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to She Plans Dinner:

Share