24/07/2026
चित्रवारी 2026 03
आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी 25जुलै 2026
अबीराचा रंग l चंदनाचा गंध ll
विठ्ठलाचा संग l एकादशी ll
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🙏💐🙏
माऊली म्हणून चुका पदराखाली घालतोस, बाप बनून काळजी ही घेतोस.
कमरेवर हात ठेवून मंद हसत असतोस... माहितीये..डोळे जरी मिटलेले तरी सगळं काही दिसतं असतं हो तुला.
मागणं मागते आज..जाणीव नेणीवेच्या भोवर्यातून सहज सुटण्यासाठी बळ दे. क्षमाभाव दे.. तुझ्यासारखी सगळ्यांवर माया करण्याची वृत्ती दे. बाकी काय मागू ..न मागताही खूप काही दिलेस आजवर..🙏
म्हणून तर मनात काय माझ्या, न सांगताच समजतं तुला. आता तुझ्यावर सोपवलंय ते.... पूर्णत्वाला नेशील हा विश्वास आहे. कायम तुझा आशीर्वाद राहू देत एवढंच मागणं 🙏
वारी संपली तरी माझी चित्रवारी मात्र चालूच राहिल
राम कृष्ण हरी
रंगकोश क्रीएशन्स