Indian mom Dipali - MH22 ते अमेरिका

Indian mom Dipali - MH22 ते अमेरिका In my channel I would like to share quick, easy yet healthy recipes. I hope you enjoy

My purpose and focus of this channel is to connect with people from different walks of life, share my passion about food, music, travel, lifestyle and creativity.

06/17/2026

एका हातात वाफाळलेला चहा आणि समोर पसरलेला अथांग निसर्ग, बस याच एकांतात स्वतःची भेट होते..
#चहा

आज आहे 31 मे, माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस हो लाडका यासाठी म्हणतीये कारण की हा माझा मोठा भाऊ आहे आणि आमच्या घरातला सगळ्...
05/31/2026

आज आहे 31 मे, माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस हो लाडका यासाठी म्हणतीये कारण की हा माझा मोठा भाऊ आहे आणि आमच्या घरातला सगळ्यांचाच दादा कारण की हा आमच्या घरातला आई-वडिलांचा पहिला मुलगा आजी आजोबांचा पहिला नातू.. आणि पहिल्या बाळ जेव्हा घरात येतं तेव्हा ते सगळ्यांचाच लाडकं असतं बरोबर.. म्हंटलं चला आज भावाला थोडंसं तू आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे पोस्ट मधून सांगूयात.. खरंतर काय आहे ना खूप जास्त भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी जाऊन त्याला भेटावसं वाटतं पण माझं दुर्दैव असं की मी साता समुद्रापलीकडे अमेरिकेमध्ये असते आणि मागच्या वर्षी जेव्हा भारतात गेले तेव्हा भावासोबत राहिला तसं तर फार काही जास्त भेटलं नाही.. नेमका मी मागच्या वर्षी मे मध्ये वापस आले पण तेव्हा भाऊ मात्र ट्रिपमध्ये भयानक बिझी होता पण आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की त्याच्या लागोपाठ व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित सगळ्यांना एक सोबत घेऊन ट्रीप एका मागून एक चालू आहेत आणि एवढं जास्त मेहनत तू घेतोयस ना ते पाहून कधी कधी खूप इमोशनल व्हायला होतं.. पण म्हणतात ना ज्याच्यात करायची हिंमत असते ना देव पण त्यालाच परीक्षा जास्त पास करायला सांगतो.. तुझ्या कठोर मेहनतीचं लवकरच यश मिळेल आणि तुझे सगळे स्वप्न लवकरच पूर्ण होतील..

आईच्या डोळ्यातला तारा, वडिलांच्या डोळ्यातली हिंमत, बहिणींच्या डोळ्यातला मार्गदर्शक, वहिनीच्या डोळ्यातला कायमस्वरूपी खंबीर साथ. पलक कनिष्क आणि योजस यांचा आनंद आदर्श आणि लाडका पप्पा. नातेवाईक आणि मित्र-मित्र परिवारामध्ये कधीही न थकणारा प्रत्येकाला मदत करणारा एक भक्कम मित्र.. आणि आमच्या मुलांचा म्हणजेच तुझ्या भाच्यांचा आणि भाचीचा लाडका लाडका मामा.. अशा या व्यक्तिमत्त्वाला खूप खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस खूप आनंदाचा उत्साहाचा आणि तुझ्या आवडीचा येवो एवढीच माझी प्रार्थना.

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भाऊराया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.. खूप खूप मेहनत करत आहेस, यश नक्कीच मिळणार तुला..
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला..
Happy birthday dear bhawu 🎉🎂💐 Balaji Lalpotu

05/18/2026

बघा आजची रेसिपी मी नाही तर अहो नी केलेली आहे.. मराठवाडा स्पेशल कांद्याचेफळ #रेसिपी
#मराठी #पारंपारिकपदार्थ

05/14/2026

तुमच्या घरी सगळेजण बडीशोप प्रेमी असतील तर हा हा व्हिडिओ नक्की पहा 😊एवढं टोकदार जर मुलांच्या घशात अडकलं तर कसं होईल ? #मराठी

05/11/2026

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,
प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!
माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

04/02/2026

अगदी हेल्दी अशी चविष्ट अशी ओल्या नारळाची ही सुकी चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा.. #खोबरे #चटणी

03/31/2026

घाईच्या वेळी अशी चमचमीत भरलेली दोडका भाजी नक्कीच करून पहा.. #मराठी #दोडका #भाजी

नवीन वर्षाची ही सुरुवात तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी किरणे घेऊन येवो.तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळ...
03/19/2026

नवीन वर्षाची ही सुरुवात तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी किरणे घेऊन येवो.तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवोतुमचे जीवन आनंदाने फुलून जावो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक  तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी  जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेवि...
08/31/2025

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी.. गणपती बाप्पा मोरया 😍🙏🙏 #

Address

Sunnyvale, CA
94087

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian mom Dipali - MH22 ते अमेरिका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Indian mom Dipali - MH22 ते अमेरिका:

Share